ये... छोटु एक कटींग दे रे.. !!
का? रे.... तुष्या आज ऑफ़िसावरुन लवकर....
आणि इथे कट्ट्यावर आम्हाल कसं काय दर्शन दिलत..
शि-याने कट्ट्यावर बसत विचारलं...
नाही रे हाल्फ़ डे घेतला मुड नव्हता आज....
का रे काय झालं?
कुछ नहीं यार...वही रोज रोज की टॆन्शन्स मग दुसरा जॉब शोध ना....
अरे काय सल्ला देतोयस?????......
प्रत्येक कंपनी सध्या टेक्नीकल नॉलेज ला महत्व देतेय...
आम्ही काय बी. कॉम ग्रज्युएट...अकांउंट्स च्या वर्तुळाबाहेर जग नाही रे आम्हाला...
तुझी लाईफ़ खरच सही आहे यार..एकदम हींदी पिक्चरमधल्या हिरोसारखं जगणं आहे...
आमच्या नशिबाच्या रेषा आम्ही हाताने कोरतोय तुझ्या तर आधीच कोरलेल्या आहेत त्याही देखण्या नक्षीत...
कॉलेजमध्ये आमच्यासोबत फ़क्त एक ऎश म्हणुन होतास
आता आराम करतोयस उद्या वडिलांचा बिझनेस सांभाळशील...एखाद्या दिवशी तुझे वडिल तुला ऑफ़ीसला नेउन म्हणतील...."श्रीरंग बेटा आजसे तुम यहा इस खुर्सी पर बैठोगे आजसे ये कंपनी तुम्हारी...!!
गप रे साल्या त्यातही केवढी लफ़डी आहेत तुला नाही कळणार...अरे ज्याला त्याला आपलं ते कार्ट आणी दुस-याच ते सोनुलचं वाटतं ...ज्याची जळते ना त्यालाच कळते...
मागुन दिन्या गाडीचा हॉर्न वाजवत हात दाखवुन पुढे गेला....
साल्याला दोन मिनिटं थांबता येत नाही का? शि-या वैतागला.
अरे कामात असेल यार.. साहेबांच लग्न आलय चार दिवसांवर घाईत असेल...
हा..आणि कामं करणार पक्का कामचोर आहे दिन्या...मागच्याच महिन्यात त्याच्या तातश्रींनी त्याला गाडी रिपेअर करुन आणायला सांगितलेली तर याने त्यांना "नाही करत" म्हणत उलट उत्तर दिलेलं...आठवतं का?
शि-या तु पण ना...यार शिंदेसरांसारखा आहेस...वेळेवर तुला अश्यागोष्टी बरोबर आठवतात त्यांच्या सारखाच हातात लाल कलरचा पेन घेऊन फ़िरतोस दिसली चुक की मारला शेरा...सोड ना तुला काय घेणं देणं ...बिघडला आता
तो...चांगल्याच्यात गेला...आपण कायं जैसे थे...उद्या तुझंही लग्न होणारच..
आणी साल्या तुझंही.....शि-याने मध्येच वाक्य तोडलं.....
हं माझं...... माझं कसलं रे??
का रे काय झालं...
काही नाही यार सोडं...
तुष्या सांग का?? ते...
सांगतो...! आधी तु सांग तुझी नात्याची व्याख्या काय?
का रे आज डायरेक्ट हा प्रश्न का?
काही नाही रे सहजच विचारतोय....
शि-या.....नातं म्हणजे काय ? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं....
हं..नातं... तुष्या नातं म्हणजे चांदण..
जसा रात्री पडणा-या चांदण्यात एकटा चंद्र दिसतो ना तस काही आपण असतो
इतके जवळ असुनही भरवसाचं कुठलच चांदण नसतं त्याच्यासाठी...
आणि हे चांदण म्हणजे तु करत असलेल्या प्रवासात तुला क्षणभराची..काही काळापुरती सोबत..
मग ते कुठलही असो आइ-बाप,भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, प्रेयसी-बायको, मुलं-बाळं, आणि बरेच काही..
एका ठराविक वेळेपुरते ही आपल्याला या प्रवासात कंपनी देतात, आपल्या सोबत हसतात, रडतात, जगतात,
त्यांनाही आपला प्रवास असतो रे..आपण फ़क्त ती
सोबत एंजॉय करायची...सुख: दुख: वाटुन घ्यायचे..
जशी तुलाही त्यांची गरज असते तशी त्यांनाही तुझ्या सोबतीची गरज असते..
त्यात गुंतण, न गुंतण हे सर्वस्वी तुझ्या हातात असतं,
तुझ्या म्हणण्यापेक्षा तुझ्या मनाच्या हातात...!! मी बघ तसच करतो...
अरे आज आहे उद्या नाही, कशाचाही भरवसा नसतो हे शापित सत्य आहे मित्रा..
आपलं इथ काही नसतं ना कुठली वस्तु, ना पैसा, ना कूठली माणसं...
मग कशाला उगाच या गोष्टींच ओझं घेउण फ़िरायचा हे माझं ते माझं, हा माझा तो माझा,
हे काहीच नसतं तुष्या..इथं फ़क्त आपण असतो आपण..आपणच आपल्यासाठी जगायचं असतं...
मी तर म्हणतो अश्या गोष्टीत गुंतण्यापेक्षा समोरचा प्रत्येक क्षण, दिवस मजेत घालवायचा....
आणि हसत शेवटापर्यंतचा प्रवास करायचा...सोबतच्या असलेल्या चांदण्याबरोबर....
याच प्रवासाला जगणं आणि त्या चांदण्याला नातं म्हणतात...
म्हणजे कमीत कमी मी तरी म्हणतो ऑर मानतो....
एका दमात हे सगळं सांगुन शि-याने खिशातले सिगारेचं पाकीट काढलं...
माझ्या समोर केलं मी हातानेच नको केलं...
आज खरंच मुड नाही रे...
"अच्छा.. !! आता तु सांग काय प्रॉब्लेम झाला...?
काही नाही यार...श्रेयाचा फ़ोन आलेला मघाशी...!!
मग...?
काही नाही लग्न ठरलं तिचं...
कधी..? कुणाशी..?
आजच तिने लगेच मला कॉल केला...आणि सांगितलं
पुण्यातला मुलगा आहे सॉफ़्टवेयर इंजिनियर...एम.एन.सी मध्ये जॉबला आहे...
चांगलं पॅकेज मिळतं घरच्यांनी आज पहायचा पोग्राम ठेवलेला...पुढच्या महीन्याची तारीख काढलीये...
लग्नानंतर लगेच ऍब्राड्ला जाणार आहेत...
अरे पण तुझ्यासाठी थांबणार होती ना ती?
शि-याने वैतागत विचारले..त्याचा आवाज जरा मोठा झालेला..
टपरीवरच्या भैयाने हातातले पान खाली ठेवता ठेवता आमच्या दोघांकडे पाहीलं...
समोरुन शि-याच्या घरची गाडी येत होती आत त्याचे वडील होते...
"शि-या तुझे डॉन....!!
मी शि-याला सावध केलं..शि-याने हातातली सिगारेट पटकन फ़ेकली....
"श्रीरंग....चल रे.....!! शि-याच्या वडीलांनी त्याला हाक मारली....
चल तुझ्या....रात्री येतो कट्ट्यावर मिस कॉल टाक नंतर..
शि-याने पाठीवर थाप मारली आणि उडी टाकुन गेला....
प्रेम म्हणजे काय? नाती म्हणजे काय ?
काही प्रश्नाची आपल्याला जाणीव असते.
त्यांची उत्तरदेखील काही प्रमाणात माहीत असतात पण पण या प्रश्नांची जाणीव
आणि उत्तर देखील माहीत असुन उपयोग होत नाही..
त्यांच अस्तित्व जास्तच गुढ आणि गर्विष्ठ असतं श्रेयाचे शब्द अजुन कानात घुमत होते.
"व्हायचं तेच झालं तरी तुला मी सांगत होते....
तुझं म्हणणं मला पटतयं रे..पण मी घरच्यांना नाही रे पटवुन देऊ शकत.."
एरव्ही शब्दांशी खेळणारा मी, पण आज तेच शब्द काळजात पार घुसत गेले.
माझ्यासारखेच असे कित्येकजण असतील ज्यांच्या स्वप्नांचा दुनियेच्या या व्यवहारीक पणामुळे निखारा झाला असेल..
आणि आज त्यात आणखी एक निखारा...आग भडकतच चाललीये साला...
प्रेम..प्रेम खेळ आहे सगळा दोन मनं काही कारण नसताना..नसताना की असताना शिट..
आज माझंच काही खरं दिसत नाही का या गुंत्यात अडकलो.
आजवर इतकं लिहिलं, वाचल, पाहील, अनुभवलं..कशाचाही काही उपयोग नाही...
आजही विचार करुन असा काय मोठा तीर मारणार..
जाउ दे, उलट या विचांराच्या गोंधळात पडलं की जिवघेणा त्रास सुरु होतो...
काही प्रश्न-उत्तरांना आकार नसतो.. हेच खरं पहीलं अश्यावेळी काहीतरी लिहुन काढावसं वाटायचं,
पण आता शि-याचे शब्द आठवतात..."शब्दात जगणं सोड मित्रा, व्यवहारीक हो!"
दुनियादारिला किंमत नसते, जोतो स्वार्थासाठी जगतो.."
तेव्हा या मुद्द्यावर भांडायचो पण आता त्याचच पटतयं.
आपलीच माणसं आपल्याला हे सांगत असतात, पावलोपावली जाणीव करुन देतात..
आपलीच माणसं पैश्यासांठी, स्वार्थासाठी अशि परकी व्हावीत,
आणि आपण त्यांच्यासाठी सारं काहि विसरुन झटत राहायचं.. का ?कशासाठी?
आता अवस्था अर्जुनासारखी झालीये...
तोही तिथं कुरुक्षेत्रावर आपल्या माणसांच्या विरोधात लढायला तयार नव्हता..
आणि इथं मी आपल्या माणसांशी व्यवाहारिकपणात नाही राहु शकत....
त्यांना सोडु नाही शकत...आता काय? मी सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे?
"चांदण्यांनी भरलेल्या आभाळाला नजर लागावी आणि
त्याला हवा असलेला त्याच्या जवळचा एक-एक तारा त्याच्या नकळत असा निखळून खाली पडावा....
आणि त्यांनी फ़क्त ओल्या डोळ्यांनी ते पहात रहावं...
निखळलेला तो प्रत्येक तारा कुठल्याश्या सरोवरात पडल्यानंतर शात होऊन
आपल्या नव्या अस्तित्वात स्वछ्चंदी जगणं जगत राहीलेला चंद्रानं पाहयचं अन,
त्यातच आपलं सुख मानायचं असतं." हा नियतीचा नियम आहे...नियतीचा नियम..
त्याच्यापुढे माझ्यासारख्यांच काय ???
शि-या बोलत होता त्यात तथ्य होतं माणुस किती वेळ कुणासाठी थांबु शकतो कुणाबरोबर राहु शकतो...?
पाच मिनिटं, पाच दिवस, पाच महीने, पाच वर्ष.....
त्यानाही त्याची दुखणी असतातच की त्यानाही त्यांच जग असतच...
आपनही त्यांच्यासारखेच...व्यवहार हा जगण्यातलाच एक भाग मग भले त्यात स्वार्थ असु दे....
खिशात मोबाईल वाजला...कूणीतरी मिस कॉल दिला...
उगाच हसलो...कुणाचा असेल....मिस कॉल देणारी तर गेली...आता कोण...????????
लॉक खोलले..घरचा होता....
बॅग घेउन......गाडीला कीक मारली....
अन, घराची वाट धरली.....
- सचिन काकडे

11 comments:
mast lihilay lekh tumhi .... aavdala mala .... aagadi khar khur jivan rekhatal aahe hyat .....
******
sanskruti kadam ...
hi katha mazi nahi ......... kathechya khali lekhakach nav dilela aahe Mr. Sachin Kakade....... kharach khup sundar lihili aahe tyane katha......... mala khupa aavadali mhanun mi ethe post keli aahe ........ so that mazyasarkhach anek rasikana tyacha aanand gheta yava .......
kharach chan katha ahe..kami shabdat khup kahi sangun geliye...koni aplya ayushyatun nighun jat tyachya tyachya sobat ayushya pan sampat pan tarihi jagav lagat...!! konachi life konamule thambat nahi..he true ahe pan accept karan khup jast avaghad.
kup chan katha ahe barobar ahe jagat kup tension astat pan te sarv apnch sodwayche astat sahi re
far chan vatla leka ayushya as ast he kala
sanjay khandagle
sntmast ahe,
asach aste jagne.......
mast.....
asach aste he jivan.......
khup chan lihilay. kharch natyanche arth kadhi kdhi smjayla phar kathin jat,
good...gr8 writing :)
http://yogendralondhe.blogspot.in/
khup agdi apratim ....... ha anubhav baryach janana yeto ......pan chalta he ....
hyalach jivan ase nav....
Post a Comment