Total Pageviews

Thursday, July 29, 2010

मला आवडलेल्या काही कविता

मला आवडलेल्या काही कविता ....... काही कवितांचे कवी माहित नसल्यामुळे कवी-अज्ञात असे लिहिले आहे ............. जर कोणाला त्यांचे कवी माहित असतील तर मला जरूर कळवा  ..........


शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास

कवी - अज्ञात

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


प्रेम नको...
खरचं यार प्रेम बिम काही नको...
बस...आता सगळं पुरे झालं..
कोणासाठी तिष्ठणं नको...
आजवर झालेलं पुरे झालं..
डोळ्यांत दाटलेलं पाणी नको..
अन आभाळात ओघळता मेघ नको
रात्र रात्र जागणं नको...
त्याच जुन्या पायवाटांवर चालणं नको..
बस...आता सगळं पुरे झालं..
आता प्रेम बिम काही नको...
उगाचच लिहीणं काहीही...निरर्थक..
उगाचचं वाचणं...तेच...पुन्हा पुन्हा..
आता ह्यातलं.. काहीच नको
बस...बस..मी अन मीच...
बाकी प्रेम बिम काहीच नको

Omkar

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


आला दारात माझ्या
बोलला आपटून काठी
चल तयार हो आता
मृत्यु तुझा मी ....
आलो तुझ्याच साठी

माझ्या चेहऱ्यावरचं...
समाधानाचं हसूं पाहुन
भ्रमित बिचारा मृत्यु तो
बोलला आवाज पाडून....

मला पाहून भल्याभल्यांची
अशी काही बोबडी वळते...
तू भेटलास पहिलाच असा
ज्याच्या गाली खळी पड़ते...

सांगितले मी त्याला
जीव सगळा एकवटून
आणखी किती मारशील मला
जीव गेलाय आधीच विरून ....
रोज तिच्या आठवणीत इथे मी
मरत आहे झुरून झुरून...

बस इथे उशाशी माझ्या
बनव ह्या खाटेला आता
तू माझीच मृत्युशैय्या
थकलो होतो किती मी
वाट पाहून तुझी वेड्या
सुरु कर तू काम तुझे...बघ
उरल्या घटका किती थोड्या

"जशी तुझी इच्छा" म्हणून
मृत्युने घेतले मला सामावून....
झाला एकरूप माझ्याशी...
अगदी काही क्षणासाठी...

तुझ्या विरहाचे भाले....
तुझ्या आठवणींच्या कट्यारी ..
झेलल्या त्याने ही उभारी...
लागल्या जेव्हा जिव्हारी...
आली ऐकू त्याची किंकाळी...
पुढच्याच क्षणी जखमी मृत्यु...
मला सोडून बाहेर पडला...

एक हात जखमेवर धरून..अस्पष्टसा बोलला...
"अरे कसले हे प्रेम आणि कसल्या त्या आठवणी
माझ्या क्रौर्याची परिसीमाही आज ओलांडली त्यांनी
तुझ्या रोजच्याच मरणाला...आज मी ही अनुभवलं
राम राम माझा तुला...तुझ्या दारी येण गडया.... मला नाही परवडलं "

--पंकज सोनवणे....


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


एक होता चिमना आणि एक होती चिमणी 
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार 
तरीही एकमेकांचे जिवलग यार.
 
वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
 
चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित, 
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत  
 
रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही  मनात असू देत अशाच काहीशा भावना 
 
एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले 
  
त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
  
का “नाही”  ह्याची बरीच कारणे सांगितली 
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात  नाही पटली
 
चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली 
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना 
 
चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला 
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला
 
चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता 
 
चिमणीने  सुद्धा  आता हसत जगायचे ठरवले 
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले   

एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'
'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या
वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर
गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं .

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
 किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे..

प्राजक्त असून दारी, फुले शेजारीच पडतात..
ज्यांचा आहे तिटकारा, असेच प्रसंग का घडतात..?
नशिबाचे उधळलेले वारु, अचानक अडतात..
स्वप्नांचे इमले वास्तवात न येताच मोडतात..
अवाजवी अपेक्षांचं आता इथंच सांडायचं आहे... ||१||

तुझ्याशी नाही रे..
 मला स्वतःशीच भांडायचं आहे..

कर्तव्याचं भान सोडून, थोडं मनमुराद जगायचं आहे..
सगळ्या जगाला विसरुन, फक्त माझ्याकरता काही मागायचं आहे..
बंधनं झुगारुन सगळी, बिनधास्त वागायचं आहे..
माझं जीवनगीत मला, माझ्याच सुरात गायचं आहे..
धुंद श्रावणलहरींमध्ये.. वारा पिऊन, बेफाम हिंडायचं आहे.. ||२ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..

सुख दुखाःचा ऊन-पाऊस, आशा निराशेचे चढ-उतार
मूक संवेदनांचे हुंकार आणि कल्पनेने छेडलेली.. हृदयीची तार..
शतरंगी भावनांचे पदर, अलवार उलगडणार आहे..
आयुष्याच्या रंगमंचावर, कलंदर बनून बागडणार आहे..
अस्तित्वाच्या क्षितिजावर यशाचं तोरण बांधायचं आहे.. ||३ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे.. !

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

एकाकी        

आज फार सुनं सुनं वाटतंय
एकटा वाटतंय मला...
असं वाटतंय कि कोणी नव्हतंच माझ्याबरोबर
फक्त माझ्यासाठीच असं
हा स्वार्थ हा लोभ ही इच्छा
काय उपयोग आहे याचा ?
जे मागते ते मिळत नाही, जे हवं ते कळत नाही
आणि जे शोधते ते गवसत नाही!
बहुतेक आज माझी लेखणीच बोलणार आहे
हे शब्दच माझे सोबती असणार आहेत
आज कागदालाही धन्य वाटत असेल की
त्यावरच माझ्या मनाची पाटी कोरी होणार आहे...
मी लिहित राहीन, लिहित राहीन
माझ्या भावना बरसात राहीन
पण त्याचा होईल का कधी उपयोग?
भावना थेट भिडण्याचा येईल का कधी योग?
आजपर्यंत कधी नशिबावर विश्वास ठेवला नाही
पण आज कुठेतरी भाग्यच फिस्कटल्यासारखा वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय...

गेले होते भर भर चालत पुढे
पण आज पाऊल फार जपून टाकावासा वाटतंय
आपलं कोण ? उपरं कोण? फार मोठा प्रश्न पडलाय
उत्तर शोधू की सत्य? मन शोधू की माणसं   
प्रश्नोत्तरे म्हणजे देवाने भेट दिलेला खेळ !
मला तर विशीतच दमल्यासारखा वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय....

मी ठरवलं होतं स्वप्ननगरीत जायचा
मी ठरवलं होतं फुलपाखरू व्हायचा
पण साचलेली दलदल तेवढी दिसली नाही!
आत आत खोलवर बुडत गेले मी
श्वास कोंडला तेंव्हा किंमत कळली
हात पाय मारत वर आले मात्र जखमा तेवढ्या राहिल्या...
त्याही जाणार हळू हळू हे मला आज कळतंय
मला कशाचाच काही नाही असं वाटतंय...
आज मला फारच सुनं सुनं वाटतंय

देशील का रे मित्र माझी साथ ?
म्हणशील का रे की तू एकटी नाहीस?
कधी मारशील कारे पाठीवर एक निस्वार्थी थाप?
कधी धरशील का रे विश्वासार्थी माझा हात ?
राहूदे रे. नको घेउस  तू अपेक्षांचा ओझं
तू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय
पण तुझ्याआधी मीच निघणार असं वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय... 

- @ नेहा घाटपांडे     


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर कही मीळत नाही.

कोणीतरी सोबत आहे अस क्षणभर वाटत,
त्या गोड सोबतीसाठी वेड मनही धावत सुटत.
तरीही मग ते दीशाहीन का होत ते काही कळत नाही,
वेड्या मनाचा सुर माझ्या कधीच कुणाशी जुळत नाही.

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
दीवस सरतो चुटकीसरशी पण रात्र काही टळत  नाही.

एक्ट जगण्यात ही अर्थ आहे अस काहीस वाटत,
पण तेवढ्यात त्याच्या सहवासतल प्रेम मनात साठत,
तरीही मग मी एकटीच का ते काही कळत नाही,
सगळ्याना मीळत हव ते मग मलाच का ते मीळत नाही.

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर काही मीळत नाही.

माझ मन जरा जास्तच हळव आहे अस कधी वाटत,
रागाने येणार्या शब्दानी माझ्या अवघ आभाळही सहज फाटत.
मग माझेच शब्द एवढे कठोर का ते काही कळत नाही,
म्हणूनच वेड्या मनाचा सुर माझ्या कधी कुणाशी जुळत नाही.

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
दीवस सरतो चुटकी सरशी पण रात्र काही टळत  नाही

त्याच्यावर प्रेम कराव आणी करतच रहाव वाटत,
क्षण दोन क्षणात मनी उदंड प्रेम दाटत.
पण मग तो माझा का नाही ते काही कळत नाही
सगळ्याना मीळत हव ते मग मलाच का ते मीळत नाही

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर काही मीळत नाही.

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


कळले कुणाला मझ्या मनातले
ना कळले कुणाला प्रेम माझ्या ह्र्दयातले
ना कळले कुणाला दुःख माझ्या माझ्यातले
सुखच सुख दिसते आहे माझ्या जिवनातले
थंडीच्या गारव्यात रखरखत्या उन्हात
मी त्याची वाट पाहिली
त्याला बघताच मी माझी न उरली
ना कळले कुणाला मझ्या मनातले
दिवस-रात्र आठवण काढते त्याची
बोलण्यासाठी तरसते त्याच्याशी
ह्र्दय हे आवरेणा
ना कळले कुणाला मझ्या मनातले
कळी उमलली मोगरा फ़ुलला
प्रेमाचा अंकुरहि सहज फ़ुट्ला
प्रेमीकांचा संगम झाला
ना कळले कुणाला मझ्या मनातले
तुला पाहीले प्रेम समजले
प्रीतीचे फ़ुल हळूच उमलले
तुला मी माझ्या ह्र्दयात बसविले
ना कळले कुणाला मझ्या मनातले
नजरेत तुझ्या मी स्वतःला हरविले
दुःखच दुःख उरले
गेलास तु दुर माझ्यापासूनी
ना कळले कुणाला मझ्या मनातले
जीवनातले सुख सहज सरले
रडणे मन वरुनी हसताना दिसले
फ़ुलही दिसले काटेही बोचले
ना कळले कुणाला मझ्या मनातले!!!

-Radha


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

''कविता कशा सुचतात रे ?''
माझ्या मित्राचा नेहमीचा प्रश्न
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो

'' अरे फार काही अवघड नाही रे
एक कोरा कागद, एक पेन आणि अस्वस्थ मन
एका जागी जमले, सूर जुळले की
मग होऊन जाते कविता
वार्‍यावर उडणार्‍या पिसाप्रमाणे मन भरकटू लागते
अन् भरकटल्यासारख्या कविता करू लागते
आता हल्ली कविता भरकटत चालल्या आहेत खर्‍या
पण जिथे माणूसच भरकटत आहे तिथे कवितांच काय ?

कविता म्हणजे स्वातंत्र्य, कविता म्हणजे मोकळा श्वास
कुणी शिकवून येत नाहीत रे कविता
इथे शब्दांची जुळवाजुळव नको अन् भावनांचा आविष्कार ही नको
केवळ जे सुचेल ते लिहावे, मनास रुचेल ते लिहावे
कुणाच्या तरी प्रेमात ही पडावे
एकदा तिच्या प्रेमात पडलो की कवितांची वेल अशी बहरते म्हणून सांगू...
मग ध्यानी मनी केवळ प्रेमाच्याच कविता...
प्रेम असेपर्यंत सगळे ठीक असते
पण विरहात मात्र शब्दच अधिक साथ देतात
मग शब्दांच्या प्रेमापुढे ते प्रेम फिके वाटू लागते
बघता बघता आपण कवितेच्याच प्रेमात पडू लागतो

पहिल्यांदा जो फक्त छंद असतो
त्याची नंतर सवयच लागते
वेड्यासारख्या कविताच करायला लागतो
दिवसभर जिथे तिथे कविताच
रात्र-रात्र जागून काढली आहे रे
आणि अंधारात चाचपडत एका कोर्‍या कागदावर
दिसत नसतानाही कविता लिहिली आहे
काय सांगू तुला ?

हे वेडेपण अंगात भिनत जाते
आणि वेडेपणाने जगण्यात खरा शहानपणा आहे हेही कळत जाते
मग शहाण्यासारखे जगण्याचा वेडेपणा कोण करणार ?
हळूहळू व्यसनच लागते कवितांचे
मग आपल्या नेहमीच्या बोलण्यालाही लोक कविताच समजू लागतात
अर्थात आपल्याला काही फरक पडत नाही
आपण स्वछन्दपणे या आभाळात विहरतो
सुख-दु:खाच्या या फसव्या जगापासून
आपण केव्हाच मुक्त होऊन जातो
आता फक्त मी आणि माझी कविता
मी तिच्यात भिनत जातो आणि ती माझ्यात... ''

एवढे सांगून ही हे शहाणे लोक काही समजत नाही
आणि शेवटी वेड्यासारखा प्रश्न विचारून मोकळे होतात

'' मला शिकवशील का रे कविता ?''
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो....

-काव्य सागर